Lipstick: जगातील पहिली लिपस्टिक कुठे बनवली गेली, कोणी पहिल्यांदा वापरली?

मेकअपमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिपस्टिक. आज हा महिलांच्या मेकअपचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. लिपस्टिक शिवाय मेकअप पूर्ण होत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज लिपस्टिक अनेक शेड्स आणि डिझाइन्समध्ये उपलब्ध आहे, पण मेकअपच्या जगात ती नवीन नाही. त्याचा इतिहास सुमारे 5000 वर्षांचा आहे.

भारतीय संस्कृतीत लिपस्टिकचा समावेश महिलांच्या 16 श्रृंगारांमध्ये करण्यात आला आहे. इतिहासकारांच्या मतानुसार, फार काळापासून याचा वापर केला जात आहे, आणि फळांच्या रस आणि फुलांपासून रंग तयार करतात आणि ते ओठांवर लावले जात होते.
लिपस्टिक बाजारात आणण्याचे आणि सामान्य बनवण्याचे श्रेय फ्रेंच परफ्यूम कंपनी गुलेरियनला जाते. या कंपनीने 1884 मध्ये पहिल्यांदा लिपस्टिकची व्यावसायिक विक्री सुरू केली.
ग्रीक साम्राज्यात लिपस्टिकबाबत कायदा करण्यात आल्याचाही उल्लेख आहे. येथे वेश्यांना गडद रंगाची लिपस्टिक लावावी लागायची. एक प्रकारे ही वेश्यांची ओळख बनली होती.
त्याच वेळी, गडद लिपस्टिक प्रसिद्ध करण्याचे श्रेय मर्लिन मनरो आणि एलिझाबेथ टेलर यांना जाते. तिने फक्त गडद लाल लिपस्टिक वापरली, ज्यामुळे ही शेड सर्वात प्रसिद्ध झाली.
आता लिपस्टिकशिवाय महिलांचा मेकअप अपूर्ण असतो, सर्रास महिला लिपस्टीक वापरतात.