Winter healthcare tips:हिवाळ्यात अमृत आहे 'ही' हर्बल टी! जाणून घ्या कशी बनवायची ही चहा..

Winter health tips: प्राचीन काळापासून हर्बल औषधांमध्ये चक्रफुलाचा वापर केला जात आहे. आधुनिक संशोधन आता त्याचे फायदे देखील अधोरेखित करत आहे.

Continues below advertisement

चक्रफुल

Continues below advertisement
1/8
चक्रफुलाची चहा अनेकांना आवडू लागली आहे. हा मसाला चीन आणि व्हिएतनाम येथील एका झाडाच्या सुकलेल्या फुलांपासून बनवला जातो.
2/8
चक्रफुलांमधील शिकिमिक अ‍ॅसिड हे अँटीव्हायरल औषधांमध्ये वापरले जाते. हे फूल शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.
3/8
एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात चक्रफुलं टाका आणि त्यांना मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं उकळू द्या.
4/8
या चहात तुम्हाला आवडत असेल तर मध, आले किंवा दालचिनी घालू शकता. यामुळे चहाची चव अधिक रुचकर होते. हा चहा कॅफिन नसल्यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी पिण्यास योग्य आहे.
5/8
स्टार बडीशेप चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. पोटात गॅस होणे, फुगी येणे किंवा जडपणा जाणवणे यावर तो आराम देतो.
Continues below advertisement
6/8
याची सौम्य गोड आणि मसाल्याची चव मन शांत करण्यास मदत करते. त्यामुळे झोप चांगली लागते आणि शरीर रिलॅक्स होते. यात अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे आरोग्यास लाभदायक असतात.
7/8
महत्त्वाचं म्हणजे स्टार अ‍ॅनिसचे दोन प्रकार असतात चायनीज स्टार अ‍ॅनिस, जो पिण्यास योग्य आहे, आणि जपानी स्टार अ‍ॅनिस, जो विषारी असल्यामुळे सेवन करू नये.
8/8
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Sponsored Links by Taboola