Heart attack symptoms : हृदय विकाराची लक्षणं माहिती आहेत का? आजच जाणून घ्या!

हार्ट अटॅक अचानक होत नसतो, त्याआधी शरीर काही चेतावणी देतं. हार्ट अटॅक येण्याच्या अंदाजे एक आठवड्यापूर्वी ५ लक्षणे दिसू शकतात आणि त्यांना दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

Continues below advertisement

Heart attack symptoms

Continues below advertisement
1/11
हार्ट अटॅक हा आजार अचानक होतो असे अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात शरीर आधीच काही संकेत देत असत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅक येण्याच्या आठवडाभर आधी काही लक्षणे दिसू शकतात आणि ते ओळखणं अत्यंत महत्वाचं आहे.
2/11
सर्वप्रथम, छातीत येणारा जडपणा किंवा दडपण हे सर्वात मोठे चिन्ह मानले जाते. हा त्रास काही मिनिटांसाठी असतो पण तो हात, पाठ, मान किंवा मांडीपर्यंतही पसरू शकतो.सर्वप्रथम, छातीत येणारा जडपणा किंवा दडपण हे सर्वात मोठे चिन्ह मानले जाते. हा त्रास काही मिनिटांसाठी असतो पण तो हात, पाठ, मान किंवा मांडीपर्यंतही पसरू शकतो.
3/11
याशिवाय, कोणतही मोठं काम न करता आलेला असामान्य थकवा व दुर्बलता हेही एक धोकादायक संकेत आहेत.
4/11
लहानशा हालचालीनंतरही श्वास घ्यायला त्रास होणे, भिती जाणवणे ही लक्षणं हार्ट अटॅककडे निर्देश करतात. अनेकदा पचनाशी संबंधित त्रास, छातीत जळजळ होणे किंवा अपचन हे देखील हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात.
5/11
त्याचप्रमाणे भरपूर घाम येणे आणि चक्कर येणे ही लक्षणे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचे संकेत असू शकतात.
Continues below advertisement
6/11
अशा कोणत्याही लक्षणांचा अनुभव आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ईसीजीसारख्या तपासण्या करून हृदयाची स्थिती तपासता येते.
7/11
हृदय निरोगी ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. आहारात ताज्या भाज्या, फळे यांचा समावेश करणे, तेलकट व प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे यामुळे धोका कमी होतो.
8/11
नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाल हृदय मजबूत ठेवतात.
9/11
धूम्रपान आणि मद्यपान यापासून दूर राहणे, तसेच ताणतणाव कमी ठेवणे हा हृदयाच्या आरोग्यासाठी मोठा फायदा ठरतो.
10/11
बहुतांश वेळा लोक ही लक्षणे सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे धोका वाढतो. त्यामुळे शरीर देत असलेल्या या चेतावणी संकेतांना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
11/11
ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे, त्यामुळे कोणतेही नवे उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola