Healthy Potato for Diabetics : डिप्लॉइड बियांद्वारे मधुमेहींसाठी आरोगदायी बटाटा आता बाजारात उपलब्ध!

Healthy Potato for Diabetics :सीपीआर इंडियाने बटाट्यावर केलेले एक संशोधन पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या संशोधनामुळे भविष्यात बटाटा जमिनीतल्या कंदांऐवजी थेट बियाण्यांद्वारे पिकवता येणार आहे.

Continues below advertisement

Healthy Potato for Diabetics

Continues below advertisement
1/9
ही बियाणे तयार करण्यासाठी डिप्लॉइड नावाची आधुनिक पद्धत वापरली जाईल. या पद्धतीत बटाट्यांमध्ये फक्त दोन गुणसूत्रे असतात, त्यामुळे त्याचे गुणधर्म नियंत्रित करणे सोपे होते.
2/9
संशोधकांनी तयार केलेल्या नव्या बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना हा बटाटा सुरक्षितपणे खाता येऊ शकतो.
3/9
यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले असून, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
4/9
तसेच यात सोलानिन आणि चाकोनिन ही त्रासदायक रसायने कमी केल्यामुळे उलटी, चक्कर, पोटफुगणे यांसारख्या त्रासांचा धोका कमी होऊ शकतो.
5/9
या बदलांमुळे हा बटाटा कमी कॅलरीचा आणि अधिक आरोग्यदायी अन्न ठरू शकतो. ब्लड शुगर, ब्लड प्रेशर किंवा यूरिक ऍसिड असलेल्या लोकांनाही याचा फायदा होऊ शकतो.
Continues below advertisement
6/9
नवीन डिप्लॉइड बियाणे पुढच्या वर्षी बाजारात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळूहळू पारंपरिक बटाट्यांच्या जागी ही नवी प्रजाती येऊ शकते.
7/9
याचा फायदा शेतकऱ्यांना जास्त उत्पादन, चांगली गुणवत्ता आणि अधिक भाव—मिळण्यात होईल.
8/9
या संशोधनामुळे लोकांच्या बटाट्याविषयीच्या आरोग्याच्या धारणा बदलू शकतात आणि बटाटा एक अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न म्हणून ओळखला जाऊ शकतो.
9/9
(टीप: वरील माहिती केवळ माहितीसाठी आहे. एबीपी माझा यातील कोणताही दावा करत नाही.)
Sponsored Links by Taboola