Causes of Weak Nails : सुंदर आणि मजबूत नखांसाठी योग्य आहार व काळजी!
Causes of Weak Nails : नखे तुटणे किंवा नाजूक होणे हे पौष्टिक घटकांच्या कमतरतेचे लक्षण असून, संतुलित आहार आणि योग्य पोषणामुळे नखं मजबूत व सुंदर राहतात.
Continues below advertisement
Causes of Weak Nails
Continues below advertisement
1/9
नखे तुटणे किंवा नाजूक होणे हे शरीरातील कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. योग्य आहार आणि पोषक तत्वांनी नखांचे आरोग्य सुधारता येते.
2/9
महिलांसाठी नखे हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नसून व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग असतात. आकर्षक नेल आर्ट आणि रंगीत नखं त्यांच्या आत्मविश्वासात भर घालतात आणि व्यक्तिमत्त्व अधिक खुलवतात.
3/9
अनेकजणी हात पाय सुंदर दिसावेत म्हणून नेल पॉलिश, नेल आर्ट किंवा नेल पिअर्सिंग करतात.
4/9
मात्र, नखे वारंवार तुटणे किंवा पांढरे डाग येणे हे पौष्टिक कमतरता आणि आरोग्य समस्यांमुळेही होऊ शकते.
5/9
शरीराच्या आरोग्यासाठी तसेच नखांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.
Continues below advertisement
6/9
डॉक्टरांच्या मते, नखांचे पोषण आतूनच मिळते, म्हणून संतुलित आहार अत्यंत गरजेचा आहे.
7/9
आहारात दूध, केळी, मखाना, काळे तीळ आणि काजू यांचा समावेश केल्यास नखं मजबूत राहतात.
8/9
पुरेसं पाणी पिणं, रासायनिक नेल पॉलिशचा कमी वापर आणि नियमित काळजी घेतल्यास नखे सुंदर आणि निरोगी राहतात.
9/9
(टीप: वरील सर्व माहिती केवळ माहितीपुरती असून, एबीपी माझा यामध्ये कोणताही दावा करत नाही).
Published at : 11 Nov 2025 03:13 PM (IST)