स्क्रीन टाइम वाढतोय? डोळ्यांचं आरोग्य जपा अशा पद्धतीने
Healthy Eye
1/10
आजकालचा बहुतांश वेळ आपण मोबाईल, लॅपटॉप किंवा टिव्ही स्क्रीनकडे बघण्यात घालवतो.
2/10
सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो, डोळे कोरडे पडतात, डोकेदुखी होते आणि झोपेवर परिणाम होतो.
3/10
त्यामुळे मोबाईल वापरणं टाळणं शक्य नसल्यास, ते योग्य पद्धतीने वापरणं आवश्यक आहे.
4/10
मोबाईल वापरताना 20-20-20 नियम पाळावा – म्हणजे दर २० मिनिटांनी २० फूट दूर असणाऱ्या एखाद्या वस्तूकडे २० सेकंद बघा.
5/10
यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो.
6/10
याशिवाय, स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवणे, ब्लू लाईट फिल्टर वापरणे, आणि शक्यतो डार्क मोड निवडणे हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
7/10
रात्री झोपायच्या किमान १ तास आधी मोबाईल वापरणं टाळल्यास, झोपही चांगली लागते.
8/10
दररोज थोडा वेळ डोळ्यांचा व्यायाम करणं आणि थंड पाण्याचे शिंतोडे डोळ्यांवर देणं, यामुळेही डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
9/10
जर डोळ्यांत सतत कोरडेपणा, लालसरपणा किंवा धूसर दिसणं जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 29 Jul 2025 02:03 PM (IST)