Zero Calorie Sugar : झीरो कॅलरी शुगरचं सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण, हृदयविकाराचा वाढता धोका
झीरो कॅलरी शुगर (Zero Calorie Sugar) साखरेपेक्षा (Sugar) कमी नुकसानकारक असते, असं म्हटलं जातं. पण नवीन संशोधनात झीरो कॅलरी शुगरबाबत मोठी धक्कादायक बाब उघड झाली आहे. (PC : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया संशोधनानुसार, झीरो कॅलरी शुगर आरोग्यासाठी घातक असल्याचं समोर आलं आहे. एका संशोधनात असे समोर आले आहे की, झीरो कॅलरी शुगरचं सेवन म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. (PC : istock)
झीरो कॅलरी शुगर सेवन करणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी आहे. आरोग्यासाठी घातक असल्याचं एका नव्या संशोधनात समोर आलं आहे. (PC : istock)
एरिथ्रिटॉल नावाच्या झीरो कॅलरी साखरेमुळे हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो, असा या संशोधनात उघड झालं आहे. (PC : istock)
क्लीव्हलँड क्लिनिकच्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. या संशोधनात असं म्हटलं आहे की, रक्तातील एरिथ्रिटॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. (PC : istock)
नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या संशोधनात आढळून आलं आहे की, झीरो कॅलरी शुगरचे सेवन केल्याने शरीरात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. (PC : istock)
यामुळे स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढतो. ही फार चिंतेची बाब आहे, कारण झीरो कॅलरी शुगरच्या सेवनामुळे मृत्यूचा धोका अनेक पटींनी वाढतो. (PC : istock)
क्तातील एरिथ्रिटॉल झीरो शुगरची पातळी वाढत जाते, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो, रक्त गोठल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोकाही वाढतो. (PC : istock)
संशोधनात सहभागी असलेल्या एका वरिष्ठ सांगितलं की, झीरो शुगर सेवन करणाऱ्यांचा असा समज आहे की, यामुळे आपल्या आरोग्याला कोणताही धोका नाही. त्यामुळे हे लोक याचं सर्रास सेवन करतात. असे लोक झीरो-शूगर कोल्ड्रिंकचं सेवन जास्त प्रमाणात करतात. पण झीरो कॅलरी शुगरचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असं सशोधनात समोर आलंय. (PC : istock)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (PC : istock)