Extra Virgin Olive Oil: जाणून घ्या एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमध्ये अन्न शिजवण्याचे फायदे!

बाजारात ऑलिव्ह ऑईल थोडे महाग असले तरी त्याचे फायदे माहित असतील तर पैसे खर्च करायला हरकत नाही.

Extra Virgin Olive Oil

1/8
भारतीय घरांमध्ये तेलकट पदार्थ खाणाऱ्या लोकांची कमतरता नाही. परंतु त्यांची हीच सवय लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, यकृताच्या समस्या, हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल वेसल डिसीज यांसह आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देते.
2/8
या सर्व समस्या टाळण्यासाठी, आपण हेल्दी कुकिंग ऑइल वापरणे महत्वाचे आहे.
3/8
स्वयंपाकाचे तेल वजन वाढवण्यासाठी खूप जबाबदार असतात, कारण त्यात सॅच्युरेटेड फॅट असू शकते, ज्यामुळे पोट आणि कंबरेची चरबी वाढते. त्याऐवजी तुम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल वापरत असाल तर हळूहळू वजन कमी होऊ लागेल.
4/8
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटचे समृद्ध स्रोत मानले जाते, ते रक्तातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवत नाही, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
5/8
त्यामुळे ऑलिव्ह ऑईलमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो.
6/8
अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की जर तुम्ही नियमितपणे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचे सेवन केले तर टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होईल कारण त्यात फिनोलिक कंपाऊंड असते जे इन्सुलिनची पातळी सुधारण्यास मदत करते.
7/8
जर तुमची हाडे कमकुवत असतील तर दैनंदिन जीवनातील सामान्य कामे करण्यात खूप अडचणी येतात, त्यामुळे मजबूत हाडांसाठी तुम्हाला नियमित एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचे सेवन करावे लागेल.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)
Sponsored Links by Taboola