Health Tips : चहा पिण्याच्या किती मिनिटे आधी पाणी प्यावं? फायदे आणि तोटे काय?

Drink Water Before Tea or Coffee : बरेच लोक चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी पितात? याचे फायदे आणि तोटे...

Drink Water Before Tea or Coffee

1/11
भारतात चहा हा इथल्या संस्कृतीचा एक भाग आहे. इथे प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला चहाचे स्टॉल सापडतील. सकाळी चहा प्यायल्याशिवाय अनेकांचा दिवसही सुरु होत नाही. (Image Source : istock)
2/11
रिकाम्या पोटी जास्त चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (Image Source : istock)
3/11
काही लोक आहेत जे चहा पिण्याआधी पाणी पितात. चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी प्यायलं तर पोटात अॅसिड तयार होत नाही. (Image Source : istock)
4/11
चहा आणि कॉफी दोन्ही पोटासाठी घातक आहेत. ते पोटात गेल्यावर आम्ल तयार करते. चहाचे पीएच मूल्य 6 असते तर कॉफीचे पीएच मूल्य 5 असते. (Image Source : istock)
5/11
तुम्ही चहा किंवा कॉफी पितात तेव्हा शरीरात अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. (Image Source : istock)
6/11
अल्सर आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. पण चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी प्यायल्यास. त्यामुळे हा धोका काही प्रमाणात कमी होतो. (Image Source : istock)
7/11
पाणी प्यायल्याने आतड्यात एक थर तयार होतो जो चहा आणि कॉफीमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो. (Image Source : istock)
8/11
रिकाम्या पोटी चहा पिणे खूप हानिकारक आहे. यामुळे पोटात ऍसिड तयार होते. त्यामुळे दातही खराब होतात. (Image Source : istock)
9/11
यामुळे दात किडणे देखील वाढते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तुम्ही डिहायड्रेशनला बळी पडू शकता. चहा किंवा कॉफी पिण्याच्या किती वेळा आधी पाणी प्यावे, हे माहित असणं गरजेचं आहे. (Image Source : istock)
10/11
चहा किंवा कॉफी पिण्याच्या अगोदर किमान 10 ते 15 मिनिटे पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे अॅसिडीक परिणाम कमी होतो. तसेच चहा आणि कॉफी प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. (Image Source : istock)
11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Image Source : istock)
Sponsored Links by Taboola