Tea Side Effects: जाणून घेऊया चहाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते...
हिवाळ्यात चहा प्यायला बहुतेकांना आवडते. चहाच्या सेवनाने सर्दीपासून आराम मिळतो आणि शरीर उबदार राहते. एवढेच नाही तर थकवा दूर करण्यासाठी लोक कामाच्या दरम्यान ब्रेक घेतात आणि चहा पिण्याचा आनंद घेतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण तुम्हाला माहित आहे का की चहाचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे.
हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी तुम्हीही वारंवार चहा पीत असाल तर लगेचच ही सवय बदला. नाहीतर... तुमची ही सवय तुमचे आरोग्य बिघडेल.
चला तर मग जाणून घेऊया चहाच्या अतिसेवनामुळे आरोग्याला कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायला असाल तर लगेच तुमची ही सवय बदला. कारण सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आम्लपित्त वाढू शकते आणि त्यामुळे तुमची पचनक्रियाही बिघडू शकते.
फार कमी लोकांना हे माहित असेल की दुधामध्ये चहा आणि साखर मिसळल्याने शरीरातील ऍसिडिटीची पातळी वाढते, ज्यामुळे शरीरात ऍसिड वाढू लागते तसेच यूरिक ऍसिड वाढू लागते.
त्यामुळे जर तुम्ही चहाची सवय सोडू शकत नसाल तर ग्रीन टी घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)