Health Tips: जेवणाआधी दारु प्यावी की नंतर? दारु पिणाऱ्यांनो एकदा वाचाच...
काहींना लग्नाची हळद, पार्टी आणि केवळ विशेष दिवशी मद्यपान करणं आवडतं, तर काही लोकांना नेहमी मद्यपान करण्याची सवय असते. काहींना जेवणाआधी, तर काहींना जेवणानंतर मद्यपान करायला आवडतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवणाआधी किंवा जेवणानंतर मद्यपान केल्याचा शरिरावर नेमका काय फरक पडतो? हे समजून घेऊया.
जर आपण दारू पिण्याआधी काही खाल्लं असेल तर पोट आधीच पचनक्रियेत व्यस्त असतं आणि त्यामुळे जेवल्यानंतर दारु प्यायल्यास ती शरीरात लवकर शोषली जात नाही.
काही न खाताच दारु प्यायल्यावर ती वेगाने छोट्या आतड्यापर्यंत जाते आणि रक्तात मिसळते.
रक्तात मिसळल्यानंतर दारु ह्रदय आणि मेंदूपर्यंत पोहोचते आणि ती चढण्यास सुरुवात होते.
रिकाम्या पोटी दारु प्यायाल्याने ती लगेच चढते आणि शरीरावर तिचा परिणाम होतो.
जेवण केल्यानंतर मद्यपान केल्यास दारु लवकर चढत नाही. कारण अन्न हे दारु अडवण्याचं काम करतं आणि त्यामुळे शरीराला जास्त हानी पोहोचत नाही.
मद्यपान करण्याआधी प्रोटीनयुक्त जेवण करा आणि मद्यपानासोबत हलके स्नॅक्स खा, यामुळे दारु जास्त चढणार नाही.
दारु पिताना स्नॅक्स खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी दारुचा हँगओव्हर देखील कमी राहील.