Benefits Of Walnuts : 'या' लोकांनी अक्रोड कधीही खाऊ नये; शरीरावर मोठे दुष्परिमाण होतात.
अक्रोडमध्ये प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. पण काही लोकांना अक्रोड खाल्ल्यानंतर अॅलर्जी, पोटदुखी, जुलाब अशा समस्या होऊ शकतात.(Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण अक्रोडमध्ये ऑक्सॅलेट्स नावाचे एक प्रकारचे रसायन असते. ज्यामुळे काही लोकांना अॅलर्जी होते. (Photo Credit : Pixabay)
ज्या लोकांना त्याची अॅलर्जी आहे त्यांना ही लक्षणे दिसू लागतात; चेहरा, ओठ किंवा घसा सुजणे, श्वास घेण्यास त्रास होणे, जुलाब, उलट्या होणे यासारख्या समस्या होऊ शकता. (Photo Credit : Pixabay)
कधीकधी गंभीर अॅलर्जीमुळे, ऑक्सिजनची कमतरता आणि जलद हृदयाचे ठोके यांसारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. (Photo Credit : Pixabay)
अल्सरची समस्या असलेल्या लोकांनी अक्रोड अजिबात खाऊ नये. अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात चरबी आणि तेल असल्यामुळे पोटात आम्ल वाढते, ज्यामुळे अल्सर यासारखे आजार होऊ शकतात. (Photo Credit : Pixabay)
ज्या लोकांना आधीच अल्सर,अॅसिडिटी किंवा पोटाशी संबंधित कोणताही आजार आहे. त्यांनी अक्रोड अजिबात खाऊ नये. अक्रोड खाल्ल्याने पोटात जळजळ, वेदना आणि पेटके यासारखी लक्षणे वाढू शकतात.(Photo Credit : Pixabay)
अक्रोडमध्ये असलेल्या फॅट आणि कॅलरीज शरीराच्या चयापचयवर परिणाम करतात. त्यामुळे वजन वेगाने वाढू शकते. (Photo Credit : Pixabay)
वजन कमी करण्यासाठी, आहार आणि व्यायामाचे योग्य संतुलन खूप महत्वाचे आहे, ज्यामध्ये अक्रोड सारख्या उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचा वापर करू नये. जरी केले तरी कमी प्रमाणात करावा. (Photo Credit : Pixabay)
अक्रोडमध्ये असलेल्या ऑक्सॅलेट्समुळे काही लोकांमध्ये पोटदुखी, उलट्या, पेटके, गॅस, जुलाब, अॅसिडिटी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच ज्यांची पचनसंस्था नीट काम करत नाही अशा लोकांमध्ये या समस्या अधीक वाढू शकतात.(Photo Credit : Pixabay)
ज्या लोकांच्या तोंडात, जिभेत किंवा घशात अल्सर आहेत, त्यांनी अक्रोडखाल्यास या समस्या आणखी पसरू वाढू शकतात. कारण अक्रोडात भरपूर उष्णता असते. अक्रोडाचा गुणधर्म हा उष्ण असतो. म्हणूनच उन्हाळ्यात बऱ्याचदा अक्रोड खाणे टाळले जाते. (Photo Credit : Pixabay)