Weight Loss :पोटाची चरबी कमी करायची आहे? या गोष्टींना आहाराचा भाग बनवा आणि शिल्पा शेट्टीसारखी फिगर बनवा
वजन कमी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येकाला सडपातळ कंबर आणि सुंदर फिगर हवी असते. जर तुम्हाला चांगली फिगर मिळवायची असेल तर वजन कमी करणे खूप गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांचा खूप उपयोग होऊ शकतो. या दिवसात वजन कमी करायचे असेल तर आहारात बदल करणे आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्रोडमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात.
यामध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
पेरू वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
पेरूमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. हिवाळ्यात पेरू भरपूर प्रमाणात उपलब्ध होतो. पेरूचा नाश्त्यात समावेश करून तुम्ही वजन सहज कमी करू शकता.
रताळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात.
रताळे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. फायबर चयापचय वाढवण्याचे काम करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
गाजर पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. हिवाळ्यात गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत.
गाजरातही फायबर चांगल्या प्रमाणात असते. गाजरात कॅलरीजही कमी असतात. यामुळे पोट लवकर भरते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)