Vitamin -E capsule use: व्हिटॅमिन- ई कॅप्सूलच्या थेट वापरामुळे शरिरावर होणारे परिणाम....
व्हिटॅमिन- ई चेहऱ्यासाठी खूप फायद्याचे असते. चेहरा लवकरात लवकर सुंदर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. पण असं केल्याने तुमचा चेहरा खराब होण्याची देखील शक्यता असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्ही थेट ही कॅप्सूलच्या तुमच्या चेहऱ्यावर लावली तर तुमच्या त्वचेला इजा पोहोचण्यास सुरुवात होते. पिंपल, डाग, कोरडी त्वचा यांसारखे त्रास होण्यास सुरुवात होते.
यामुळे त्वचारोग देखील होण्याची शक्यता आसते. खाज, कोरडी त्वचा यांसारखे परिणाम त्वचेवर होतात.
यामुळे सूज, डोळ्यांना खाज येणे, त्वचा रखरखीत होणे हे सुध्दा त्रास होऊ शकतात.
याने चेहरा नक्कीच उजळेल, परंतु त्यावर अनेक डाग येण्यास सुरुवात होते. चेहरा काळपट पडण्यास देखील सुरुवात होते.
जर तुम्ही व्हिटॅमिन- ई कॅप्सूल चेहऱ्यावर लावत असाल तर तुमच्या त्वचेत संवेदनशीलता देखील जाणवायला सुरुवात होते.
जर व्हिटॅमिन- ई कॅप्सूलच्या आणि ऍलोवेरा जेल एकत्र करुन लावले तर चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवून टाकावा..