Health Tips : तुम्हीही दुधाबरोबर 'या' पदार्थांचे सेवन करताय? वेळीच थांबा, अन्यथा...

Health Tips : दूध हे पौष्टिकतेचे उत्तम स्रोत मानले जाते, परंतु काही पदार्थांबरोबर दुधाचे सेवन टाळावे.

Health Tips

1/11
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पोषक तत्वांची मुबलक प्रमाणात आवश्यकता असते आणि पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. या पोषक तत्वांमध्ये दुधाचा समावेश आहे.
2/11
बहुतेक लोकांना रात्री दूध प्यायला आवडते. तर काही असे आहेत जे सकाळी नाश्त्यात दूध पितात. कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन ए, बी6, डी, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयोडीन यांसारखे पोषक घटक दुधात आढळतात.
3/11
दही : आयुर्वेदानुसार, दह्याचे दुधाबरोबर कधीही सेवन करू नये. तसेच, दूध प्यायल्यानंतर दहीही खाऊ नये.
4/11
कारण ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला पोटाची समस्या होऊ शकते.
5/11
गूळ : अनेक लोक दुधात गूळ घालतात. गूळ आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात शंका नाही. पण, आयुर्वेदात दूध आणि गुळाचे एकत्र सेवन करणे हानिकारक मानले गेले आहे. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते.
6/11
मासे : मासे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण, आपण नेहमी दुधासह माशांचं सेवन टाळावे.
7/11
यामुळे, तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या जसे की, पोटदुखी आणि अन्न विषबाधा इ. एवढेच नाही तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते.
8/11
मसालेदार अन्न : जर तुम्ही अनेकदा दुधाबरोबर मसालेदार पदार्थ खात असाल तर आतापासून तसं करणं थांबवा. कारण यामुळे अ‍ॅसिड रिफ्लक्सचा धोका तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.
9/11
सॉल्टेड स्नॅक्स : चिप्ससारख्या सॉल्टेड स्नॅक्ससोबत दूध पिण्याची चूक करू नका. कारण त्यात भरपूर मीठ मिसळले जाते, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते.
10/11
प्रथिने समृद्ध पदार्थ : दुधात प्रथिने आधीच मुबलक प्रमाणात आढळतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही प्रथिनेयुक्त अन्न खाण्यास सुरुवात केली तर अचानक तुमच्या पचनसंस्थेवरचा भार वाढू शकतो.
11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Sponsored Links by Taboola