Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिणे फायदेशीर, तितकेच आरोग्यासाठी घातक
साधारणत: जेवणानंतर अनेकदा लोक बडीशेप माऊथ फ्रेशनर म्हणून खातात. तर, काही जण रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिऊन वजन झपाट्याने कमी करण्याचा प्रयत्न करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबडीशेपचे पाणी प्यायल्याने अनेक आजार दूर राहतात. बडीशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारखे घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
सकाळी रिकाम्या पोटी एका बडीशेपचे पाणी पिण्याचे फायदे आणि तोटे नेमके कोणते आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिऊ नये. यामुळे त्वचेवर ऍलर्जी होऊ शकते.
बडीशेपचे पाणी रक्तदाबही नियंत्रित ठेवते. बडीशेपमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. म्हणूनच ते रिकाम्या पोटी प्यायल्याने खूप फायदे होतात.
बडीशेपचे पाणी पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी प्यावे.
बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटदुखीची तक्रार दूर होते. त्यामुळे पोटात जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीने बडीशेपचे पाणी पिऊ नये.
गर्भवती महिलांनी सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिऊ नये. हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.