Health Tips : पांढरा, तपकिरी की लाल? निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी कोणता तांदूळ फायदेशीर? वाचा सविस्तर
Health Tips : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात लाल तांदळाचा समावेश करू शकता.
Continues below advertisement
Health Tips
Continues below advertisement
1/9
लाल भात खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
2/9
लाल तांदळात लोह, मॅग्नेशियम आणि झिंक यासारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.
3/9
हृदयाच्या आरोग्यासाठीही लाल तांदूळ जास्त फायदेशीर आहे.
4/9
लाल तांदूळ हा एक ग्लूटेन-मुक्त तांदूळ आहे म्हणून ग्लूटेन फ्री लोक देखील ते खाऊ शकतात.
5/9
लाल तांदळात कमी कॅलरी असतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये फायबर आढळून येते जे पोट भरून भूक कमी करते. लाल तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Continues below advertisement
6/9
लाल तांदळात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे लाल तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगला पर्याय आहे.
7/9
लाल तांदळात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळतात, जे हाडांसाठी अत्यंत महत्वाचे पोषक असतात. लाल भात खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
8/9
जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकार असेल तर त्यांच्यासाठी लाल तांदूळ खूप फायदेशीर आहे. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 23 Oct 2023 03:39 PM (IST)