Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Health Tips : कोणत्या पक्ष्याची अंडी खाण्यासाठी सर्वात फायदेशीर? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
अंड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे फायदे आहेत. चला जाणून घेऊयात अंड्यांचे विविध प्रकार आणि त्यांचे फायदे नेमके कोणते आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडी आपल्या सर्वांसाठी खूप चांगले असतात. त्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि इतर अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात जे आपल्या शरीराला ऊर्जा देतात. अंडी खाल्ल्याने आपली हाडे आणि स्नायू मजबूत राहतात.
अंड्यांचे अनेक प्रकार आहेत. जसे की, कोंबडीची अंडी, बदकाची अंडी, शहामृगाची अंडी. यामध्ये कोंबडीची अंडी आपण सगळेच खातो. पण, मासे, बदक आणि लहान पक्ष्याच्या अंड्यांमध्ये देखील वेगवेगळे पोषक असतात जे आपल्यासाठी खूप फायदेशीर असतात. उदाहरणार्थ, माशांची अंडी आपले हृदय चांगले ठेवण्यास मदत करतात. बदकाच्या अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी आणि आयरन मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
माशांची अंडी (Fish eggs) : ओमेगा 3 फॅटी ऍसिड, व्हिटॅमिन डी आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.
बदकांची अंडी (Duck eggs) : या अंड्यांमध्ये लोह, व्हिटॅमिन डी, अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतात.
लहान पक्षाची अंडी (Quail eggs) - यामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.
टर्की अंडी (Turkey eggs)- यामध्ये भरपूर प्रोटीन असतात आणि त्यात कोलेस्ट्रॉलचं प्रमाणही फार कमी असतं.
हंसाची अंडी (goose eggs)- हंसाच्या अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी 12, लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात असते.
इमूची अंडी (Emu egg)- इमूच्या अंड्यांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड मोठ्या प्रमाणात असते जे हृदयासाठी फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12, लोह आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात आढळतात.
शहामृगाची अंडी (Ostrich Egg) : एका शहामृगाच्या अंड्यामध्ये सुमारे 20 कोंबडीच्या अंड्यांएवढे पोषक घटक असतात. त्यामध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असते. लोह, सेलेनियम, फॉस्फरस यांसारखी महत्त्वाची खनिजे शहामृगाच्या अंड्यांमध्ये आढळतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.