Health Tips : सर सलामत तो पगडी पचास; मृत्यू टाळण्यासाठी रोज किती पावलं चालावीत; शास्त्रज्ञांचं संशोधन काय सांगतं?
ग्रॅनाडा विद्यापीठातील संशोधकांनी केलेला हा पहिला अभ्यास आहे ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की दररोज इतक्या पावले चालल्याने वजन कमी होऊ शकते तसेच मृत्यूचा धोकाही कमी होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंशोधकांना चालण्याचा वेग आणि त्यानंतर होणारे आरोग्य फायदे यांच्यातील संबंध आढळला आहे. यामुळे सावकाश चालण्यापेक्षा जलद चालणे चांगले असा यातून निष्कर्ष निघाला.
संशोधकांचे म्हणणे आहे की वेगाने चालण्याने हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. 7,000 ते 8,000 पावले चालणे हे दिवसाला सुमारे 6.4 किमी चालण्यासारखे आहे.
संशोधकांनी सांगितले की, तुम्ही जितकी जास्त पावले टाकाल तितके चांगले आहे. दिवसाला 9,000 पावले चालणे हे बहुतेक लोकांसाठी एक योग्य लक्ष्य आहे.
अभ्यासात 110,000 हून अधिक सहभागींचा समावेश होता. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की दररोज 2,600 पावले चालल्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो,तर 2,800 पावलं हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी फायद्यांशी संबंधित आहेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.