Health Tips : डोळ्यांची दृष्टी कमी होत चालली? 'ही' लाल भाजी रोज खा; मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे
Red Bell Pepper : लाल सिमला मिरचीमध्ये केवळ व्हिटॅमिन सीच नाही तर व्हिटॅमिन ए देखील मुबलक प्रमाणात आढळते.
Red Bell Pepper
1/9
व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. संत्री आणि आवळा यांसारख्या फळांमध्ये हे मुबलक प्रमाणात आढळते, परंतु तुम्हाला माहित आहे का की एक अशी भाजी आहे ज्यामध्ये यापेक्षा कितीतरी पट जास्त व्हिटॅमिन सी असते. पिझ्झा, पास्ता, चाप यांसारख्या पदार्थांमध्ये ही भाजी टाकली जाते.
2/9
लाल सिमला मिरची हे संत्र्यापेक्षा जास्त पौष्टिक आणि फायदेशीर मानले जाते. USDA च्या मते, लाल सिमला मिरचीमध्ये 128 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते, जे इतर कोणत्याही अन्नापेक्षा जास्त असते.
3/9
यूएसडीएनुसार, लाल सिमला मिरचीमध्ये तिप्पट 128 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असते. हे इतके पौष्टिक आहे की ते हिवाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवते आणि आजारी पडण्यापासून संरक्षण करते.
4/9
ही लाल सिमला मिरची डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळतात, जे संपूर्ण शरीराला लाभदायक ठरतात.
5/9
लाल सिमला मिरचीमध्ये केवळ व्हिटॅमिन सीच नाही तर व्हिटॅमिन ए देखील मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने त्वचेच्या समस्याही दूर होतात.
6/9
लाल सिमला मिरचीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन अँटीऑक्सिडंट देखील आढळतात, जे दृष्टी सुधारण्यास मदत करतात.
7/9
दृष्टी कमी होण्यासारखी समस्या असल्यास लाल सिमला मिरची खावी. त्यातील व्हिटॅमिन ए आणि ल्युटीन-झेक्सॅन्थिन अँटीऑक्सिडंट्स दृष्टी सुधारण्यासाठी कार्य करतात. यामुळे डोळ्यांच्या प्रत्येक समस्येवर उपाय मिळू शकतो.
8/9
लाल सिमला मिरची हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी देखील मदत करते. या फळभाजीमध्ये पोटॅशियम आणि फोलेट असते जे निरोगी हृदयासाठी आवश्यक असते.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 26 Nov 2023 05:25 PM (IST)