Health Tips : चेहऱ्यावरील 'हे' संकेत देतात सतर्कतेचा इशारा; दुर्लक्ष केल्यास किडनी होते खराब
Health Tips : किडनी हा शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे जो शरीराला निरोगी ठेवण्यासाठी नियमित कार्यरत असतो. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ तसेच अतिरिक्त द्रवपदार्थ युरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते.
Continues below advertisement
Health Tips
Continues below advertisement
1/6
किडनी हा शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. किडनीमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ तसेच अतिरिक्त द्रवपदार्थ युरिनच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकते. शरीरात क्षाराचे तसेच खनिजाचे संतुलन राखण्यात मदत करते, तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते.
2/6
पण जर किडनी खराब होत असेल तर ती स्वतः संकेत देते. जसे की, चेहरा सुजणे, सतत चेहऱ्याला खाज येणे, तोंडाची दुर्गंधी, चेहऱ्याचा रंग बदलणे अशी इतर लक्षणे दिसू लागतात.
3/6
चेहऱ्याला खाज येणे : चेहरा कोरडा पडणे किंवा वारंवार चेहऱ्याला खाज येणे ही सुद्धा लक्षणं दिसू लागतात. तसेच लाल चकते (डाग)दिसणे याला यूरेमिक प्रुरिटस म्हणतात,ते यासाठी की किडनी अनावश्यक घटक किंवा अतिरिक्त द्रवपदार्थबाहेर काढण्यास असमर्थ असते, मग त्याचे परिणाम चेहऱ्यावर दिसतात.
4/6
चेहरा सुजणे: किडनी खराब होण्याच्या मुख्य लक्षणांपैकी हे एक लक्षण आहे. या परिस्थितीत चेहरा सुजतो मुख्यतः डोळ्यांचा खालचा भाग. सहसा सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला दिसतो त्याचसोबत तोंडातून दुर्गंध येऊ लागतो.
5/6
चेहऱ्याचा रंग बदलणे : किडनी खराब होत असताना चेहऱ्यामध्ये आणखी एक बदल होतो तो म्हणजे चेहऱ्याचा रंग बदलू लागतो. चेहरा काळपट किंवा पिवळसर दिसू लागतो. कारण किडनी लाल रक्तकोशिकांचे प्रमाण वाढवण्यास असमर्थ असते. तसेच शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासू लागते.
Continues below advertisement
6/6
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 14 Dec 2025 03:03 PM (IST)