Garlic Side Effects : 'या' लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये; होऊ शकतात गंभीर परिणाम
भारतीय जेवणात प्रत्येक पदार्थांत लसणाचा अगदी हमखास वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात लसूण खाणे खूप गरजेचे आहे. मात्र, काही लोकांसाठी लसूण खाणे फार हानिकारक आहे.
ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास आहे, लसूण खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांनी ते टाळावे. याशिवाय अॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी रिकाम्या पोटी लसूण अजिबात खाऊ नये.
लसूण रोगप्रतिकारशक्तीसाठी खूप चांगला आहे, त्यामुळे हिवाळ्यात तो खाण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुमचे पोट खूप कमकुवत झाले असेल आणि काहीही खाल्ल्याने सहज अस्वस्थ होत असेल तर तुम्ही लसणाचे सेवन करू नये, यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधी आणि शरीराला घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही लसणाचे सेवन अजिबात करू नये. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.
जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.