Health Tips : मेयोनीज प्रेमींनो सावधान, जास्त मेयोनीज खाणं पडू शकतं महागात

Health Tips : लहान मुलं असो किंवा मोठी प्रत्येकाला मेयोनीज खायला आवडतं.

Health Tips Mayonnaise

1/9
बर्गर, पिझ्झा, पास्ता, मोमो, सॅंडवीच आणि इतर पदार्थांत मेयोनिजचा वापर केला जातो. काहींना मेयोनिजचं क्रिमी टेक्सचर फार आवडतं.
2/9
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मेयोनीज आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही?
3/9
मेयोनीज जास्त प्रमाणात खाल्ल्यानेआरोग्याला अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांनाही बळी पडू शकता.
4/9
मेयोनीज जास्त खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. जर तुम्हाला आधीच मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही मेयोनीज खाणं टाळा.
5/9
मेयोनीज जास्त खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते. मेयोनीजमध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे मेयोनीज जास्त खाल्ल्यास लठ्ठ होण्याचा धोकाही वाढतो.
6/9
मेयोनीज जास्त खाल्ल्यानेही उच्च रक्तदाबाची समस्या होऊ शकते. मेयोनिजमध्ये ओमेगा -6 फॅटी ऍसिडचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो.
7/9
मेयोनिजच्या जास्त सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो. एक चमचा मेयोनिजमध्ये सुमारे 1.6 ग्रॅम फॅट्स असते.
8/9
बाजारात उपलब्ध असलेल्या मेयोनीजमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम घटक वापरले जातात. यामध्ये असलेले एमएसजी आरोग्याला खूप नुकसान पोहोचवतात.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola