Health Tips : निरोगी आरोग्यासाठी 'हे' तूप अधिक गुणकारी; वाचा फायदे
Health Tips : देशी तूप गायीच्या दुधापासून बनवलेले असो किंवा म्हशीच्या दुधापासून, दोन्ही आरोग्यासाठी चांगले असते.
Health Tips
1/9
गाईचं तूप खाणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. विशेष म्हणजे हे तूप खाणं तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य तूप निवडता.
2/9
कारण गाय आणि म्हशीच्या दुधापासून तयार केलेले तूप पौष्टिक असते आणि शरीर निरोगी ठेवण्याचे काम करते.
3/9
परंतु, केवळ विशेष तूप शरीराच्या काही विशेष गरजा पूर्ण करू शकते. कारण दोन्ही तूप जरी पौष्टिक असले तरी त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत.
4/9
तूप निवडण्यासाठी सर्वात आधी तुमच्या गरजांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे. तसेचपण जर तुम्हाला चरबी कमी करताना बॉडी मास वाढवायचा असेल तर तुम्ही गायीचे तूप खावे.
5/9
जर तुम्ही खूप बारीक असाल आणि तुम्हाला वजन लवकर वाढवायचे असेल तसेच तुमचे शरीर मजबूत करायचे असेल तर तुम्ही म्हशीचे तूप निवडले पाहिजे.
6/9
जर तुमची पचनक्रिया आणि पचनाशी संबंधित समस्यांमुळे अनेकदा त्रास होत असेल तर तुम्ही देशी गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप सेवन करावे.
7/9
जर तुमचा मेटाबॉलिक रेट जास्त असेल आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज पचत असेल तर तुम्ही म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खावे.
8/9
जर तुम्हाला वाटत असेल की म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप खाल्ल्याने तुमच्या शरीराचे वजन झपाट्याने वाढते आहे, तर तुम्ही गाईच्या तूप खाऊ शकता.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 02 Jan 2023 09:10 PM (IST)