Diwali 2023 : यंदाच्या दिवाळीत वजन वाढवू देऊ नका; फिटनेसचा 'हा' मंत्रा फॉलो करा
Diwali 2023 : सणासुदीच्या काळात अन्नामध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वजनही झपाट्याने वाढतं.
Diwali 2023
1/10
संपूर्ण नोव्हेंबर महिना सणांनी भरलेला असतो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सणासुदीत गोड पदार्थांचं जास्त सेवन केलं जातं. ज्यामुळे वजन वाढू शकते.
2/10
वजन वाढल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या शरीराला घेरतात. त्यामुळे सण-उत्सवात खाण्यापिण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. संतुलित आणि पौष्टिक आहार आणि दैनंदिन दिनचर्या सुधारून वजन नियंत्रित करता येते.
3/10
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात अन्नामध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह आणि त्याच्याशी संबंधित धोके होऊ शकतात. त्यामुळे वजनही झपाट्याने वाढू शकते. अशा परिस्थितीत, दिवाळीच्या मुहूर्तावर वजन नियंत्रित करण्याचा सर्वोत्तम उपाय कोणता आहे हे जाणून घेऊयात.
4/10
सण-उत्सवात झोपण्याची आणि उठण्याची वेळ बदलते. या काळात लोक उशिरा झोपतात आणि पुरेशी झोप न घेता सकाळी लवकर उठतात. अशा स्थितीत वजन झपाट्याने वाढू शकते. चांगली झोप न मिळाल्याने काही हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे नेहमी पुरेशी झोप घेण्यावर भर द्या.
5/10
दिवाळीच्या दिवसांत फिटनेस रूटीनमध्ये अडथळा येऊ शकतो. सुट्टीच्या दिवसात बहुतेक वेळ बसूनच जातो. त्यामुळे शरीरात निष्क्रियता वाढते आणि वजन झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे शरीर सक्रिय राहण्यासाठी व्यायाम आणि योगासने यांची काळजी घ्या.
6/10
सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमच्या आहारात भाज्या, फळे, प्रथिने, संपूर्ण धान्य यांचा समावेश करा.
7/10
पोषक तत्वांनी युक्त अन्नाचं सेवन करा आणि कॅलरी नियंत्रणात ठेवा. गोड आणि प्रक्रिया केलेले पदार्थ शक्यतो टाळा. कारण यामुळे वजन झपाट्याने वाढते.
8/10
उत्तम हायड्रेशनची काळजी घेऊन शरीर निरोगी ठेवता येते. यामुळे वजनही नियंत्रित राहते. सणासुदीच्या दिवसांत पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करू नये.
9/10
पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते आणि अतिरिक्त द्रव शरीरातून बाहेर काढण्यास मदत होते. त्यामुळे सणासुदीत दररोज किमान 3-4 लिटर पाणी प्यावे.
10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 04 Nov 2023 02:47 PM (IST)