Green Tea : ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ कोणती? वाचा अनेक फायदे
वजन कमी करण्यासाठी असो किंवा त्वचेवर चमक आणण्यासाठी ग्रीन टी प्रत्येक लहान समस्या दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, जर तुम्ही चुकीच्या वेळी ग्रीन टीचे सेवन केले तर त्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.
जेवणाच्या 1 तास आधी ग्रीन टी घेतल्याने शरीराला खूप फायदे मिळतात.
ग्रीन टीमध्ये टॅनिन असते, त्यामुळे जेवल्यानंतर लगेच त्याचे सेवन केल्याने तुमचे पचन बिघडू शकते. त्यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी कधीही ग्रीन टी पिण्याचा प्रयत्न करा. नेहमी सोबत काहीतरी घ्या.
तुम्हाला जर ग्रीन टी पिणे आवडत असेल तर संपूर्ण दिवसात तीन कपपेक्षा जास्त ग्रीन टी पिऊ नका.
ग्रीन टीमध्ये असलेले पॉलीफेनॉल कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
ग्रीन टीचे सेवन केल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊ शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.