Health Tips : चहाबरोबर चुकूनही 'या' गोष्टी खाऊ नका

Health Tips : चहाबरोबर खाल्लेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो.

Tea

1/9
काहींना चहा बिस्किटांबरोबर आवडतो तर काहींना स्नॅक्सबरोबर आवडतो. दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी असो किंवा बिघडलेला मूड सुधारण्यासाठी चहा प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहे.
2/9
चहा पिताना आपण अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की चहाबरोबर खाललेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काही पदार्थ चहाबरोबर खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
3/9
विशेषतः चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.
4/9
चहाची पाने लिंबूमध्ये मिसळल्याने तुम्हाला जास्त अॅसिडिटी, ढेकर येणे आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या येऊ शकतात. लिंबू चहा सकाळी कधीही पिऊ नये.
5/9
चहा आणि भजी कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. पावसाळा आला की लोकांच्या मनात सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे चहा आणि भजी खाणे.
6/9
पण तुम्हाला माहित आहे का की कुरकुरीत किंवा चविष्ट भजी हा सर्वात हानिकारक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बेसनाचे पीठ रक्तातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यापासून रोखते. त्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.
7/9
आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ चहाबरोबर कधीही खाऊ नयेत. हे पदार्थ पचन प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम करतात. तज्ज्ञांच्या मते, गरम चहा प्यायल्यानंतर सुमारे 30 ते 45 मिनिटे थंड काहीही खाऊ नये.
8/9
हळद तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मदत करते. पण, हळद कोणत्याही प्रकारे चहामध्ये मिसळ्यास हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये हळद मिसळल्याने अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola