Peanut side effects: 'या' लोकांनी शेंगदाण्याचे सेवन टाळावे; जाणून घ्या!
शेंगदाणे खाण्याला भारतात जवळपास सर्वत्र प्राधान्य दिले जाते. त्याला स्वस्त बदाम असेही म्हणतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यात अनेक पोषक घटक आढळतात. अनेकजण थंडीत शेंगदाणे जास्त खातात.
त्यात प्रथिने, फॅटी ऍसिड, कार्ब, फायबर आणि हेल्दी फॅट असते, परंतु काही लोकांसाठी ते खूप हानिकारक असते. यामुळे अॅलर्जीचा त्रासही होऊ शकतो.
ज्या लोकांना अपचनाची समस्या आहे, त्यांनीही याचे सेवन टाळावे. रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित रुग्णांनीही याचे सेवन करण्याचे तोटे जाणून घेतले पाहिजेत.
जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्ही शेंगदाणे खाणे टाळावे कारण त्यात जास्त कॅलरीज असतात, ज्यामुळे तुमचे वजन वाढते.
ज्या लोकांना अपचनाची समस्या आहे किंवा ज्यांना पोटाच्या समस्या आहेत त्यांनी शेंगदाण्यापासून दूर राहावे कारण फुगण्याची समस्या सुरू होते.
शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात कारण त्यात सोडियमचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच तुम्ही याचे सेवन कमी प्रमाणातच करावे.
शेंगदाणे जास्त खाल्ल्याने यकृताच्या समस्याही वाढू शकतात. कमकुवत यकृत असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाणे टाळावे. दुसरीकडे, जर त्याचे जास्त सेवन केले तर वजन देखील वेगाने वाढू लागते. अशा स्थितीत त्याचे सेवन करू नये.
शेंगदाणे जास्त खाल्ल्याने त्वचेच्या ऍलर्जीचा त्रासही होतो. त्याचा दुष्परिणाम काहीसा असा दिसतो. जसे की अंगावर सूज येणे, लाल पुरळ उठणे, खाज येणे, लालसर होणे. जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर तुम्ही ते खाणे टाळावे किंवा ते खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)