Health Care: पावसाळ्यात पाणी पिताना घ्या 'ही' काळजी; अन्यथा उद्भवतील आजार
पावसाळ्यामध्ये घरात अशुद्ध पाणी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कावीळ, डायरिया, कॉलरा असे आजार उद्भवतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक असणं गरजेचं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वच्छ कापड किंवा अतिशय बारीक जाळीच्या गाळणीने पाणी गाळून घेतलं पाहिजे. पावसाळ्यात नळातून येणारं पाणी अनेक वेळा गढूळ येतं, त्यामुळे ते स्वच्छ करुन पिणं गरजेचं असतं.
पावसाळ्यात पाणी उकळून प्यावं. पाणी उकळल्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरुन जातात आणि पाणी शुद्ध होतं. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कुटुंबातील सर्वांनी उकळलेलं पाणी प्यावं. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.
पावसाळ्यात तुरटी फिरवून पाणी शुद्ध करावं. भरलेल्या पाण्याच्या भांड्यात तुरटी फिरवल्यास पाण्यातील गाळ खाली बसतो आणि पाणी स्वच्छ होतं.मात्र हा तितका खात्रीशीर उपाय नसल्याने पाणी गाळून आणि उकळूनच प्यावं.
पावसाळ्यात स्वच्छ पाणी पिण्यावर भर द्यावा. पिण्याचं पाणी स्वच्छ असलं तरीही, तुमच्या पिण्याच्या पाण्यात नियमितपणे जिवन ड्रॉपचे दोन थेंब टाकूनच ते पाणी प्यावं.
आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं. विशेषतः पावसाळ्यात तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावं. तांबे तुमच्या पिण्याच्या पाण्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आणतात.