Skin Care Tips: मेकअप करताना घ्या 'ही' काळजी; फॉलो करा या टीप्स
अनेक लोक मेकअप (Makeup) करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात. काही लोक रोज मेकअप करतात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेकअप करताना वापरण्यात आलेल्या प्रोडक्ट्सचा तुमच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते? मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात
लिपस्टिक (Lipstick) हे प्रत्येक मुलीचे आवडते मेकअप प्रोडक्ट आहे. पण अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी महिला स्वस्त लिपस्टिक खरेदी करतात. ही लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ काळे होतात.
त्वचेवरील डाग लपवण्यासाठी महिला या बर्याचदा मेकअप करताना कन्सीलरचा वापर करतात. कन्सीलरचा जास्त वापर केल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात.
अनेकांना रोज मेकअप करण्याची सवय असते. घरी आल्यावर रोज मेकअप रिमूव्हरनं मेकअप काढावा. जर तुम्ही चेहऱ्यावर तसाच मेकअप ठेवून झोपलात तर तुमची त्वचा खराब होईल.
चेहऱ्यावर मेकअप बराच वेळ ठेवल्यानं त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास होऊ शकतो.
मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा.