Sitting Posture : तुम्हीलाही पायावर पाय ठेवून बसण्याची सवय आहे? आजच ही सवय सोडा, नाहीतर...
जर तुम्हालाही पायावर पाय ठेवून बसणं आरामदायी वाटत असेल तर, तुम्ही ही बातमी नक्की वाचा. पायावर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते, कसं ते जाणून घ्या. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक लोकांना बसताना पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असते. याला क्रॉस लेग सिटींग असंही म्हणतात. म्हणजेच एका पायावर बसणे आणि दुसरा पाय क्रॉस करणे. (Image Source : istock)
बरेच लोक घरात आणि ऑफिसमध्येही पायावर पाय ठेवून बसतात. विशेषत: महिलांना पायावर पाय ठेवून बसणं सोयीस्कर वाटतं. (Image Source : istock)
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पायावर पाय ठेवून बसण्याची सवय शरीरासाठी वाईट ठरू शकते. विशेषतः पुरुषांवर याचा वाईट परिणाम होतो. पायावर पाय ठेवून बसण्याचे काय तोटे आहेत ते वाचा. (Image Source : istock)
एका संशोधनानुसार, जे पुरुष पाय ओलांडून बसतात त्यांच्या अंडकोषांचे तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंच्या संख्येवर वाईट परिणाम होतो. (Image Source : istock)
जर तुम्हाला पायावर पाय ठेवून बसण्याची सवय असेल, तर ते तुमच्या हाडांसाठी हानिकारक ठरू शकते. याचा वाईट परिणाम पाठीच्या खालच्या भागावर आणि नितंबांवर होतो आणि हाडे विशेषतः मणक्यालाही वेदना होऊ शकतात. (Image Source : istock)
पायावर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे नितंबांचे वजनही झपाट्याने वाढू लागते. पायावर पाय ठेवून बसल्याने पोटावर चुकीच्या पद्धतीने दाब पडतो, ज्यामुळे पचनक्रिया अनियमित होण्याचा धोका वाढतो. यामुळे पोटात सूज होऊ शकते किंवा पोट खराब होऊ शकते. (Image Source : istock)
पायावर पाय ठेवून बसल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर वाईट परिणाम होतो. यामुळे तुमच्या पायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो आणि पायांना सूज येऊ शकते. (Image Source : istock)
पायावर पाय ठेवून बसण्याच्या सवयीमुळे स्नायूंमध्ये असंतुलन होऊ शकते. अनेकांना या सवयीमुळे पाठीच्या खालच्या भागात दुखण्याची समस्या जाणवू लागते. (Image Source : istock)
पाय पायावर ठेवून बसल्यामुळे तुमच्या पायांमध्ये सुन्नपणा येतो. यामुळे पेरोनियल नर्व्हवर दबाव येतो, ज्यामुळे पाय तात्पुरते सुन्न होतात. (Image Source : istock)