Quick Recipe: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत कांदा भजी; हॉटेलसारखी खमंगी भजी बनवण्याची 'ही' रेसिपी पाहाच
पावसाळ्यात गरमा-गरम कुरकुरीत कांदा भजी खायला सगळ्यांनाच आवडतात. पण आपण घरात कांदा भजी बनवतो तेव्हा ते हॉटेलसारखे कुरकुरीत होत नाही, त्यांना मऊपणा येतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकांदा भजी हा पदार्थ कांदा, बेसन आणि इतर मसाले टाकून बनवला जातो. कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी काही ट्रिक फॉलो करा. या टिप्समुळे भजी नक्कीच कुरकुरीत बनतील.
प्रथम कांदा भजी बनवण्यासाठीचं साहित्य पाहूया. साहित्य: 2 उभे चिरलेले कांदे, 1 हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड, ओवा, बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, तेल, पाणी, कोथिंबीर
कुरकुरीत भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका वाटीमध्ये उभे चिरलेले कांदे घ्या. आता त्यात 1 कप बेसन, अर्धा कप तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घाला.
त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, काश्मिरी लाल तिखट, जिरं पावडर, धणे पूड आणि ओवा, कोथिंबीर घाला.
हे मिश्रण मिक्स केल्यानंतर कांद्याला पाणी सुटतं, जर पाणी सुटलं नसेल तर किंचित पाणी मिसळून मिश्रण मिक्स करा.
दुसरीकडे गॅसवर कढई ठेवा आणि कढईत तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात भजीचं तयार पीठ हाताने छोटे छोटे गोळे करून सोडा.
भजी गोल्डन ब्राऊन रंग येउपर्यंत तळून घ्या आणि कुरकुरीत कांदा भजी खाण्यासाठी रेडी आहेत.
या भजीचा आस्वाद चहा अथवा हिरव्या चटणीसोबत लुटू शकता.