पित्ताच्या समस्येने त्रस्त आहात? मग, ‘या’ गोष्टींनी मिळावा लगेच आराम!
बदलती जीवनशैली, तळळेले किंवा मसालेदार पदार्थ, खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे अनेकदा पित्ताची किंवा आम्लपित्ताची समस्या त्रास द्यायला लागते. अशावेळी आपल्या स्वयंपाक घरातील काही गोष्टी यावर लगेचच आराम देऊ शकतात. जाणून घेऊया...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुळस : तुळशीमधील अँटी-अल्सर घटक अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते. जर पित्ताचा त्रास जाणवत असेल, तर अशावेळी लगेचच तुळशीची 4 ते 5 पाने चावून खावीत.
दूध : दूध हे पूर्णान्न आहे हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. पित्तावर देखील दूध गुणकारी आहे. दूध शरीरात होणारी जळजळ कमी करून, पित्ताचा त्रास कमी करते.
बडीशेप : बडीशेपमधील अँटी-इंफ्लेमेटरी घटक पचन क्रिया सुधारतात व बद्धकोष्ठता दूर करतात. बडीशेपमुळे पोटात थंडावा येतो आणि जळजळ कमी होते.
जिरे : बडीशेपप्रमाणे जिऱ्यात देखील जळजळ कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे पित्त झाल्यास जिरे चावून किंवा पाण्यात भिजवून खावे.
पुदिना : पित्त झाल्यास आपण अनेकदा बाजारातून औषध विकत घेतो. या सगळ्याच औषधात पुदिना असतो. अर्थात पुदिना हा पित्तावरचा प्रभावी उपाय आहे. यासाठी पुदिना पाण्यात उकळवून त्याचे पाणी प्यावे.