पावसात भिजलाय? लगेच 'या' गोष्टी करा नाहीतर द्याल आजारांना निमंत्रण!

पावसाळ्यात भिजणं टाळता येत नाही. पण भिजल्यानंतर त्वरित काही सोप्या गोष्टी केल्यास सर्दी, ताप, त्वचेचे विकार यांचा धोका कमी होतो.

पावसात भिजलाय?

1/9
ओले कपडे त्वरित बदला: शरीरावर जास्त वेळ ओलसर कपडे ठेवू नका.
2/9
त्याने सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो.
3/9
केस वाळवा : डोकं भिजल्यामुळे थंडी वाजण्याचा धोका वाढतो, त्यामुळे लगेच टॉवेल किंवा ड्रायरने केस कोरडे करा.
4/9
गरम पाण्याने आंघोळ करा : कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील थंडी कमी होते आणि जंतुसंसर्ग होण्याची शक्यता कमी होते.
5/9
कोमट पेय घ्या : आलं-लिंबू-हनी चहा, हळदीचं दूध किंवा सूप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
6/9
कोरड्या टॉवेलने पाय स्वच्छ करा : पायात पाणी राहिल्यास फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.
7/9
हात-पायांना सॅनिटाईज करा : पावसाळ्यातील पाण्यात अनेक जंतू असतात, त्यामुळे स्वच्छतेची काळजी घ्या.
8/9
पुरेसा आराम करा : भिजल्यामुळे थकवा येऊ शकतो, त्यामुळे थोडा आराम केल्याने शरीर लवकर सावरतं.
9/9
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola