मुसळधार पावसात 'या' आरोग्य खबरदाऱ्या नक्की घ्या!

मुसळधार पावसात खालील ७ खबरदाऱ्या घेतल्यास आरोग्य सुरक्षित राहू शकतं..

Continues below advertisement

पावसाळा

Continues below advertisement
1/9
पावसाळा म्हणजे आनंद, निसर्गसौंदर्य आणि थंडावा... पण याच काळात अनेक आजारांचा धोका वाढतो
2/9
पावसात भिजल्यानंतर लगेच कपडे बदला, ओले कपडे शरीराला चिकटून राहिल्यास सर्दी, ताप किंवा त्वचेचे विकार होऊ शकतात.
3/9
पाण्यात सतत चालल्याने पायात इन्फेक्शन, बुरशीचा त्रास होऊ शकतो. शक्यतो पाण्यातून चालणं टाळा.
4/9
पावसाळ्यातील बाहेरील पाणी प्यायचं टाळा. बाहेरील पाणी दूषित असू शकतं. नेहमी उकळलेलं किंवा फिल्टर केलेलं पाणी प्या.
5/9
बाहेरील फास्टफूड टाळा, भजी, पाणीपुरी, चाट जरी मोहक वाटत असले तरी दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.
Continues below advertisement
6/9
डासांपासून बचाव करा, पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया वाढतात. त्यामुळे मच्छरदाणी, क्रीम, स्प्रे वापरा.
7/9
नियमित हात धुण्याची सवय ठेवा , पावसाळ्यात जंतुसंसर्ग वेगाने होतो. साबणाने हात धुतल्याने अनेक आजार टाळता येतात.
8/9
इम्युनिटी वाढवा: हळदीचे दूध, आलं-लिंबू-हनी चहा, व्हिटॅमिन C फळं खा. रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हाच सर्वात मोठा बचाव आहे.
9/9
पावसाचा आनंद जरूर घ्या, पण या छोट्या टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तब्येत बिघडणार नाही (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola