Tea : चहा जास्त उकळत असाल तर आधी हे वाचा!
कडक चहा पिण्यासाठी बराच काळ उकळवावा लागतो.जर तुम्ही दुधाचा चहा जास्त वेळ उकळत असाल तर सावधगिरी बाळगा,कारण ते हानिकारक असू शकते . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचहा जास्त वेळ उकळणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.चहा तयार करण्यासाठी लागणारा वेळ आरोग्यावर परिणाम करतो.त्यामुळे चांगला आणि कडक चहा पिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.येथे जाणून घ्या चहा किती वेळ उकळावा. [Photo Credit : Pexel.com]
जास्त उकळलेल्या चहाचे तोटे: जास्त उकळलेला चहा विषारी बनतो असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.हे प्यायल्याने ॲसिडिटीची सर्वात मोठी समस्या उद्भवू शकते.[Photo Credit : Pexel.com]
त्यामुळे आणखी अनेक समस्या उद्भवू शकतात.हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.चहा उकळायला किती वेळ लागेल? चहा बनवण्यासाठी नेहमी एक चमचा चहाची पत्ती पाणी किंवा दुधात घालाल तेव्हा ते किमान दोन मिनिटे चांगले उकळू द्या.[Photo Credit : Pexel.com]
चहा उकळायला लागल्यावर त्यात दालचिनी आणि लवंगा टाकून त्याची चव चांगली येऊ शकते.यामुळे त्याचा वासही चांगला येईल.[Photo Credit : Pexel.com]
थंड पाण्यात चहाची पत्ती टाकणे टाळावे.पाणी उकळल्यानंतर चहाची पाने टाकणे केव्हाही चांगले.चहा दोन मिनिटांपेक्षा जास्त उकळू नये.[Photo Credit : Pexel.com]
चहा पिताना या गोष्टी लक्षात ठेवा : 1.चहाची पाने किंवा पत्ती नेहमी हवाबंद डब्यात बंद ठेवा. यामुळे त्याच्या पानांची चव दीर्घकाळ टिकते.[Photo Credit : Pexel.com]
चहा बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे प्रथम चहाची पाने पाण्यात व्यवस्थित भिजू द्या,नंतर पावडर टाका. या पद्धतीने चांगला चहा तयार करता येतो. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit : Pexel.com]