Do these settings in mobile : मोबाईलच्या सेटींग्स करा, आणि घ्या सुखाची झोप!
मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा महत्वाचा घटक बनला आहे . मात्र मोबाईल मुळे अनेकदा झोपेत व्यत्यय येतो आणि तुमची पूर्ण झोप होत नाही . [Photo Credit : Pexel. com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appझोप पूर्ण होत नाही मात्र डोळ्यांना देखील याचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये म्हणून काही टिप्स आहेत ज्यांचा तुम्ही वापर करणे योग्य ठरेल . [Photo Credit : Pexel. com]
सोशल मीडिया वरील APP , साइट्स वर स्क्रोल करणे , ऑनलाइन आणखी एक लेख वाचणे, मित्राच्या संदेशाला उत्तर देणे किंवा गेम ची शेवटची लेव्हल पूर्ण करणे असे अनेक कार्य आपण मोबाईल वर करीत असतो . [Photo Credit : Pexel. com]
झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे खरोखर चांगले नाही . तरीही ते करणे थांबवू शकत नाही . पुढे काही टिप्स आहेत ज्यांच्या मदतीने तुमचा मोबाईल यापुढे तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकणार नाही . [Photo Credit : Pexel. com]
डू नॉट डिस्टर्ब : तुमच्या मोबाईल मुळे तुम्ही जास्त विचलित होणार नाही याची खात्री करणे ही सर्वात महत्त्वाची टीप आहे . आणि ते करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मोबाईल वर विशेष ‘डोंट डिस्टर्ब’ किंवा ‘स्लीप’-फंक्शन्स वापरणे . [Photo Credit : Pexel. com]
जवळजवळ सर्व स्मार्टफोन्समध्ये हे फीचर असते, तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाहीत याची काळजी घेते . जेव्हा तुम्हाला अनेक नोटिफिकेशन मिळत नाहीत, तेव्हा तुम्ही तुमच्या फोनद्वारे विचलित होणार नाही. [Photo Credit : Pexel. com]
तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या प्रकारच्या सेटिंग्ज समायोजित करू शकता. जेव्हा झोपायला जाण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही या सेटिंग मोबाईल मध्ये करणे फायद्याचे ठरते आणि तुमची झोप व्यवस्थित होते . [Photo Credit : Pexel. com]
जास्त ब्राइटनेस/ प्रकाश : जर तुम्ही रात्री मोबाईल स्क्रोल करत असाल , तर तुमच्या लक्षात आले असेल की तुमचे डोळे कधीतरी दुखू लागतात . ते तुमच्या फोनच्या स्क्रीनवरून येणाऱ्या प्रकाशामुळे होते . तो प्रकाश खरोखरच तुमची झोप उडवू शकतो ! [Photo Credit : Pexel. com]
जेव्हा तुमचे डोळे प्रकाशाच्या संपर्कात येतात , तेव्हा तुमची झोप आणि जागण्याची स्थिति खराब करू शकते परिणामी रात्री जागे राहणे . मोबाईल मध्ये (ब्राइटनेस) प्रकाश फिल्टर करण्यासाठी सेटिंग देखील आहे. [Photo Credit : Pexel. com]
नाइट मोड : तुमच्या स्क्रीनवरून येणारा प्रकाश कमी करण्याचा मार्ग म्हणजे तुमच्या स्क्रीनची चमक कमी करणे . [Photo Credit : Pexel. com]
त्यामुळे, जेव्हा सूर्य मावळतो आणि घराबाहेर अंधार असतो तेव्हा मोबाईल मध्ये हे फीचर ऑन होईल . मोबाईल च्या सेटिंग मध्ये हे बदल तुम्हाला करता येतील . डोळ्याना त्रास होऊ नये आणि नंतर शांत झोप घेण्यासाठी हे उपयोगी पडेल. [Photo Credit : Pexel. com]
टीप:वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit : Pexel. com]