Tips for Good Sleep : तुम्हीही टीव्ही पाहून झोपण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याऐवजी शांत झोपेसाठी या ट्रिक्सचा अवलंब करा!

झोपण्यासाठी अनेक जण टीव्ही पाहतात, पण ही सवय हानिकारकही ठरू शकते. टीव्हीऐवजी तुम्ही या ट्रिक्स फॉलो करू शकता!

Continues below advertisement

बदलती जीवनशैली आणि धावपळीच्या आयुष्याचाही आपल्या झोपेवर परिणाम होऊ लागला आहे. आजकाल अनेक लोक झोप न येण्याने त्रस्त आहेत, ज्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना ही सामोरे जावे लागते. अशावेळी झोपण्यासाठी अनेक जण टीव्ही पाहतात, पण ही सवय हानिकारकही ठरू शकते. टीव्हीऐवजी तुम्ही या ट्रिक्स फॉलो करू शकता.(Photo Credit : pexels)

Continues below advertisement
1/8
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाच्या आगमनानंतर लोकांचा स्क्रीन टाईम खूप वेगाने वाढला आहे. हा एक चांगला टाईम पास आहे आणि लोकांचा मूड ताजेतवाने करतो, परंतु काही लोक झोपण्यासाठी देखील याचा वापर करतात. जे लोक नीट किंवा पटकन झोपत नाहीत, ते झोपण्यासाठी उशीरापर्यंत टीव्ही पाहत राहतात आणि पाहिल्यानंतर झोपी जातात.(Photo Credit : pexels)
2/8
मात्र, स्क्रीनचा अतिवापर आपल्यासाठी हानिकारक आहे. टीव्हीमधून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या वेळी आपल्या शरीरात सक्रिय असलेल्या मेलाटोनिन संप्रेरकाशी छेडछाड करतो आणि झोपेच्या चक्रावरही परिणाम करतो. यामुळे डोळे ही कमकुवत होतात आणि झोप न लागल्याने संपूर्ण आरोग्यावर ही परिणाम होतो. अशावेळी या सोप्या ट्रिक्सचा अवलंब करून तुम्ही झोपताना टीव्ही पाहणं टाळू शकता-(Photo Credit : pexels)
3/8
संगीत ही शरीर आणि मन दोन्हीसाठी एक उत्तम थेरपी आहे. एका अभ्यासानुसार, रात्री झोपताना संगीत ऐकल्याने शरीरातील ऑक्सिटोनिनची पातळी वाढते. हे स्वायत्त मज्जासंस्था शांत करते, चिंता कमी करते, रक्तदाब कमी करते आणि चांगली गाढ झोप घेण्यास मदत करते. नाईट टाईम सॉफ्ट बीट्स गाण्यांची एक छान प्लेलिस्ट तयार करा आणि झोपताना ते वाजवा.(Photo Credit : pexels)
4/8
ऑडिओबुक्समध्ये पुस्तकं वाचण्यापेक्षा तुम्ही ती ऐकू शकता. यामध्ये तुम्ही झोपून रंजक किस्से ऐकू शकता आणि यामुळे तुम्ही तुमचे सध्याचे त्रास विसरून तणावापासून दूर राहून गाढ झोपेत झोपू शकता.(Photo Credit : pexels)
5/8
ऑडिओबुक्सप्रमाणेच पॉडकास्टमध्येही तुम्ही चांगले पॉडकास्ट ऐकता आणि पाहुण्याच्या मनोरंजक आणि प्रेरणादायी गोष्टींनी प्रभावित होतात आणि सकारात्मक विचारांनी गाढ झोपेत जाता.(Photo Credit : pexels)
Continues below advertisement
6/8
कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे मूळ तापमान नैसर्गिक पद्धतीने थंड होते. यामुळे रक्तदाब देखील संतुलित होतो, ज्यामुळे शांत झोप येते.(Photo Credit : pexels)
7/8
झोपताना मेडिटेशन ला माइंडफुलनेस मेडिटेशन असेही म्हणता येईल. यामध्ये व्यक्ती फक्त वर्तमानाचा विचार करते, दीर्घ दीर्घ श्वास घेते, ज्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळतो आणि चांगली झोप येते.(Photo Credit : pexels)
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)
Sponsored Links by Taboola