Skin Care Tips: या फळांच्या रसांचा वापर करून डागरहित आणि चमकणारा चेहरा मिळवू शकता; जाणून घ्या!
फळांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.
Fruits
1/12
चेहऱ्यावर डाग पडू नयेत, अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. सुंदर चेहरा मिळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. यासाठी लोक अनेक प्रकारचे घरगुती उपाय देखील करतात. यासाठी फळांचाही वापर केला जातो.
2/12
अशा स्थितीत तुमच्या त्वचेच्या निगा राखण्याच्या रुटीनमध्ये काही फळांचा समावेश करून तुम्ही नितळ चेहरा मिळवू शकता.
3/12
यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आणि व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. चला तर मग जाणून घेऊया चमकदार त्वचेसाठी तुम्ही कोणत्या फळांचा रस वापरू शकता.
4/12
चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी संत्र्याचा रस खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत होते.
5/12
यासाठी एका भांड्यात संत्र्याचा रस घ्या आणि त्यात मध घाला. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी पाण्याने धुवा.
6/12
गाजरातील पोषक तत्वे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठीही फायदेशीर असतात. तुम्ही तुमच्या फेस पॅकमध्ये गाजराचा रस समाविष्ट करू शकता.
7/12
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही गाजराचा रस थेट चेहऱ्यावरही लावू शकता. याचा वापर करून तुम्ही सहजपणे डागरहित आणि चमकणारी त्वचा मिळवू शकता.
8/12
काकडीत असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-के आणि इतर पोषक घटक त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. काकडीच्या रसाचा नियमित वापर करून तुम्ही चमकदार त्वचा मिळवू शकता.
9/12
डाळिंबात असलेले व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्याचा रस त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करतो.
10/12
स्ट्रॉबेरीचा रस टॅनिंगच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतो.
11/12
यासाठी एक चमचा बेसनामध्ये स्ट्रॉबेरीचा रस मिसळून पेस्ट तयार करा, नंतर चेहऱ्यावर लावा. साधारण 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा.
12/12
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( फोटो सौजन्य:unsplash.com)
Published at : 24 Jan 2023 02:01 PM (IST)