7 keys to a longer life : निरोगी आयुष्यासाठी करा 'हे' 6 सोपे जीवनशैलीत बदल!

चांगल्या आरोग्यासाठी केवळ आहार, व्यायामच नव्हे, तर जीवनशैलीतही बदल होणे गरजेचे आहे. निरोगी जीवनशैली म्हणजे उठण्याची, झोपण्याची, खाण्याची, व्यायामकरण्याची वेळ, निरोगी वजन राखणे, तणावापासून दूर राहणे.

7 keys to a longer life

1/8
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून लोक पूर्वीपेक्षा आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. डाएटपासून ते व्यायामापर्यंत सर्व कामे लोक करत असतात ज्यामुळे ते निरोगी राहतात आणि आजारांना त्यांच्यापासून दूर ठेवतात.
2/8
मात्र, चांगल्या आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायामच नव्हे, तर जीवनशैलीतही बदल होणे गरजेचे आहे.निरोगी जीवनशैली म्हणजे उठण्याची आणि झोपण्याची वेळ, खाण्याची वेळ, व्यायामकरण्याची वेळ, निरोगी वजन राखणे आणि तणावापासून दूर राहणे.
3/8
चांगल्या जीवनशैलीचा अवलंब केल्यास तुमचे वजन योग्य राहील आणि तुम्ही नेहमी निरोगी राहाल. सकाळी लवकर उठण्याची सवय तुम्हाला अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल.
4/8
सकाळी वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असते, जे सूर्य उगवल्यानंतर कमी होण्यास सुरवात होते. त्यामुळे सकाळी लवकर उठल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल. सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला मोठा दिवस मिळतो, ज्यात तुम्ही जास्त काम करू शकता.
5/8
आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी स्टॅमिना आवश्यक असतो . हेच कारण आहे की सकाळी लवकर व्यायाम करण्याची सवय तुमचा स्टॅमिना वाढवेल आणि तुम्हाला एनर्जी देईल. त्याचबरोबर तुम्ही मानसिकदृष्ट्याही निरोगी आणि मजबूत बनता.
6/8
बरेच लोक नाश्ता सोडून सरळ दुपारचे जेवण करतात. नाश्ता वगळण्याची सवय बदला आणि सकाळी व्यायाम केल्यानंतर पूर्ण नाश्ता करा. यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळेल.
7/8
बाहेरचे जेवण चविष्ट असते, पण ते शक्य तितके कमी खावे. जास्तीत जास्त घरगुती साधे अन्न खावे , जेणेकरून तुमची पचनक्रिया चांगली होईल, आजार दूर होतील आणि आरोग्य निरोगी राहील.
8/8
तसेच रात्रीचे जेवण ८ नंतर न करण्याचा प्रयत्न करा आणि जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका किमान जेवण आणि झोप यात २ तासांचे अंतर ठेवा
Sponsored Links by Taboola