Diet Tips: जाणून घ्या ज्यूस पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे...

काही लोक फळांचा रस पिणे पसंत करतात, परंतु त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी तुम्ही ते योग्य वेळी प्यावे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आरोग्यासाठी अनेक प्रकारची फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात, ज्याचा तुमच्या आरोग्याला फायदा होतो.

म्हणून, त्यांना कच्चे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण तरीही काही लोक फळांचा रस पिणे पसंत करतात. फळांचा रस पिताना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
ज्यूस पिण्याची सर्वोत्तम वेळ सकाळची मानली जाते. खर तर आठ तास झोपल्यानंतर उठल्यावर त्या वेळी काही खायची इच्छा होत नाही.
तरीही तुमच्या शरीराला उर्जेची गरज असते. अशा परिस्थितीत ज्यूस पिणे हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे शरीराला भरपूर पोषकतत्त्वे मिळतात.
व्यायामानंतरही ज्यूस प्यायला जाऊ शकतो, कारण तो फक्त तुमच्या शरीराला आवश्यक पोषकच पुरवत नाही, तर तुमच्या शरीराला नैसर्गिक साखरही देतो. व्यायामानंतर हे खूप महत्वाचे आहे.
बाजारात उपलब्ध असलेले कॅनबंद ज्यूसचे सेवन करू नका. फळांऐवजी प्रिझर्व्हेटिव्ह आणि फळांची चव जोडली जाते. ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतात.
ज्यूसच्या दुकानातून ज्यूस पिणेही टाळावे. याचे कारण तेथील स्वच्छतेचा अभाव असतो.
फळांचा रस घरीच तयार करून प्यावा.
ज्यूसचे सेवन लगेच करावे. ते जास्त काळ ठेवू नये.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)