Orange Peel: संत्र्याप्रमाणेच सालेही आरोग्यासाठी उपयुक्त, जाणून घ्या फायदे
संत्र्याप्रमाणेच त्याच्या साली आरोग्यासाठी उपयुक्त आहेत
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफायबर, व्हिटॅमिन सी आणि पॉलीफेनॉलचे हे संत्रीच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात असते.
संत्र्याची साल हे ब्लॅक हेड्स, डाग, पिंपल्स, डेड स्किन सेल्स इत्यादी त्वचेसंबंधित समस्या दूर करते.
तुम्ही संत्रीचे साल कच्च चावून खाऊ शकता किंवा त्याची पावडर तयार करुन त्या पावडरमध्ये मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावू शकता. हे मिश्रण पील ऑफ मास्कसारखे असते.
संत्रीच्या सालांपासून पावडर बनवून त्यात खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्यानं कोंडा होत नाही.
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या जाणवत असतील तर संत्रीचे साल खा.
संत्र्याच्या सालीमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर राहतात.
संत्रीच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते.
संत्र्याच्या सालीमध्ये पेक्टिन नावाचे फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.
याचा फायदा मधुमेहींंना होतो.