Foods For Hair Growth: दाट केस हवेत? तर या पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग नक्की बनवा!

जर तुम्हालाही पातळ केसांना दाट करायचे असेल तर या पदार्थांना तुमच्या आहाराचा भाग नक्की बनवा.

foods hair growth hair thickness

1/10
दाट आणि निरोगी केस कोणाला आवडत नाहीत? बहुतेक लोकांना केस गळण्याची समस्या भेडसावत असते, ज्यामुळे केस पातळ होतात. योग्य आहार केस मजबूत आणि घट्ट होण्यास मदत करते.
2/10
आपल्या केसांना फॅटी ऍसिडस्, व्हिटॅमिन सी, लोह आणि इतर मल्टीविटामिनची आवश्यकता असते. त्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी आणि ते दाट करण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
3/10
चिया सीड्स मध्ये प्रथिने, तांबे आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.
4/10
ज्यामुळे केस दाट होण्यास मदत होते. याशिवाय, चिया सीड्स केसांना केराटिन देतात, ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.
5/10
पालक ही पालेभाजी केसांच्या वाढीसाठी उत्तम आहे. पालकमध्ये जीवनसत्त्वे सी आणि ए, लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असतात.
6/10
याचे रोज सेवन केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते.
7/10
बदाम: बदामामध्ये ओमेगा-३, झिंक, व्हिटॅमिन ई, बी१ आणि बी६ आणि सेलेनियम असतात जे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
8/10
बदाम केसांना मुळापासून मजबूत करतात. याशिवाय केस चमकदार आणि दाट होण्यास मदत होते. वास्तविक, बदामामध्ये मॅग्नेशियम आढळते, जे केस दाट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
9/10
अंडी आपले केस निरोगी आणि घट्ट होण्यासाठी प्रथिनांची गरज असते. अंड्यातील प्रथिने हा सर्वोत्तम स्त्रोत आहे.
10/10
अंड्यांमध्ये प्रथिने आणि बायोटिन असतात, केसांच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचे दोन पोषक असतात, जे केस गळती रोखण्यासाठी आवश्यक असतात. त्यांचे सेवन केल्याने केस दाट होण्यासही मदत होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)
Sponsored Links by Taboola