PHOTO: या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर बनतात 'विष', आजच व्हा सावध..

टोमॅटो : बरेच लोक टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवतात. पण कदाचित तुम्हाला माहित नसेल असे केल्याने चव आणि त्यातील रस नष्ट होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
याशिवाय पोषणही संपते. टोमॅटो रूम टेम्परेचरवर साठवले पाहिजेत.

बटाटा : ही भाजी खोलीच्या तापमानालाही ठेवावी जेणेकरून त्याचं टेक्शचर टिकून राहील.
लसूण : ही भाजीही फ्रीजमध्ये ठेवू नये. असे केल्याने ते आतून रबर बनतात.
कांदा आणि लसूण नेहमी कोरड्या आणि थंड ठिकाणी ठेवा.
शिमला मिरची: जर तुम्ही फ्रिजमध्ये शिमला मिरची साठवून ठेवत असाल तर ही चूक पुढे करू नका.
कारण कमी तापमानात शिमला मिरचीची त्वचा मऊ होते आणि कुरकुरीतपणा निघून जातो. यामुळे त्याची चव नष्ट होते.
कांदा : कांदा कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. असे केल्याने त्यातील ओलावा निघून जातो आणि बुरशी येण्याचा धोका असतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)