Dates Benefits: खजूर हे आरोग्यासाठी वरदान आहे, हिवाळ्यात खाल्ल्याने खूप फायदे होतात!
खजूर खायला खूप चविष्ट तर असतातच, सोबतच ते आरोग्यालाही फायदेशीर असतात. खजूरमध्ये फायबर, प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये तांबे, मॅग्नेशियम, मॅंगनीज, लोह आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात. हिवाळ्यात खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत.
हिवाळ्यात पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. खजूरमध्ये फायबर्स चांगल्या प्रमाणात असतात, ते पचन सुधारण्याचे काम करतात.
खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या उद्भवत नाहीत. खजूर खाल्ल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
खजूर रक्त वाढवण्याचे काम करतात. अॅनिमियामध्ये खजूर खाल्ल्याने अॅनिमिया बरा होतो.
खजूर कमजोरी दूर करण्याचेही काम करतात. तसेच कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. ते आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. खजूर खाल्ल्याने शरीरातील आजार दूर राहतात. हिवाळ्यात खजूर खाल्ल्याने सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये फायदा होतो.
खजूर खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजारांचा धोका दूर होतो. खजूर खाणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
खजूर पाण्यात भिजवून किंवा दुधात उकळणे फायदेशीर आहे. दुधात उकळून ते खाल्ल्यास सर्दीचे आजार दूर राहतात, तसेच पाण्यात भिजवून खाल्ल्याने वजन आणि साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य:unsplash.com)