Egg : आरोग्य जपण्यासाठी रोज अंडी खाताय? पण जरा थांबा, अन्यथा...
अनेकजण आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज अनेक अंडी खातात. मात्र, त्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचाही धोका आहे. काहींना अंड्याची एलर्जीदेखील असते. जाणून घेऊयात अतिरिक्त अंडी खाल्ल्यामुळे शरीराला होणाऱ्या तोट्याबाबत...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रमाणापेक्षा अधिक अंड्यांचे सेवन केल्यानं ब्लोटिंग (पोट फुगण्याची समस्या) जाणवू शकते. त्यामुळे दिवसातून दोन पेक्षा अधिक अंड्यांचे सेवन करू नये. (Photo- Freepik)
अधिक प्रमाणात अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या स्तरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहग्रस्तांना अधिक त्रास होऊ शकतो. (Photo- Freepik)
दररोज अधिक अंडी खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. (Photo- Freepik)
अधिक अंडी खाल्ल्याने त्वचेवर फोडीदेखील येऊ शकतात. त्याशिवाय, एलर्जीचा त्रास होऊ शकतो (Photo- Freepik)
प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. (Photo- Freepik)
आपल्या शरीराच्या गरजेनुसार अंडी किती खावीत, यासाठी डॉक्टर, डाएटीशन यांचा सल्ला घ्यावा.