Depression Symptoms : ही लक्षणे मुलांमध्ये दिसत आहेत? मुलं डिप्रेशनमध्ये मध्ये असण्याची शक्यता!
ज्या प्रकारची जीवनशैली चा आपण सध्या अनुभव घेत आहोत त्यानुसार तणाव सतत वाढत आहे . केवळ वृद्धच नाही तर लहान मुलेही नैराश्याचे बळी ठरत आहेत . [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुस्तकांचे ओझे , एकटेपणा हा मुलांमध्ये तणाव वाढीचा विषय आहे . मुलांना आजूबाजूचे वातावरण आणि घरातील बोलणेही सहन होत नाहीत . [Photo Credit : Pexel.com]
याशिवाय मोबाईलच्या वाढत्या वापरामुळेही नैराश्य येत आहे . मुले अनेक तास मोबाईलला चिकटलेली असतात . मोबाईलवर दिल्या जाणाऱ्या कंटेंटमुळेही मुलांना मानसिक आजारी पडत आहेत . [Photo Credit : Pexel.com]
या परिस्थितीमुळे मुले कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये जाणार नाहीत याची काळजी पालकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे . हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत . [Photo Credit : Pexel.com]
मूल चिडचिडे होणे : मूल प्रत्येक गोष्टीवर भांडत आहे किंवा चिडचिड करत असेल तर पालकांनी गंभीर होण्याची गरज आहे . ही मुलामध्ये नैराश्याची स्थिती असू शकते . [Photo Credit : Pexel.com]
पालकांनी त्वरित मुलाचे समुपदेशन करावे . आवश्यक असल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावेत . [Photo Credit : Pexel.com]
मूल शांत राहणे : जर मुल खूप शांत राहत असतील . कोणाशीही बोलायला आवडत नाही . जर कोणी बोलू लागला तर त्याच्याशी बोलण्यास नकार देत असेल . अशा परिस्थितीत पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे . [Photo Credit : Pexel.com]
एकटे राहायला लागले तर : लहान मुले अचानक एकटी राहू लागली . कोणाशीही बोलायला आवडत नाही मात्र एकटेच स्वतःशी बोलू लागले तर ही परिस्थिती योग्य नाही . [Photo Credit : Pexel.com]
खाण्यात बदल : मुलांमध्ये जेवण्याची समस्या दिसून येते . भूक वाढू शकते किंवा कमी होऊ शकते , बहुतेकदा वजनात तीव्र बदल होतात . [Photo Credit : Pexel.com]
ही लक्षणे लहान मुलांमध्ये दिसत असतील तर मूल अधिक मानसिक आजारी असण्याची शक्यता असते तेव्हा त्याचे समुपदेशन करून तातडीने उपचार सुरू करावेत . [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत . [Photo Credit : Pexel.com]