Healthy Diet : 'हा' आरोग्यदायी आहार घ्या आणि मुलांची उंची झटपट वाढवा!
सर्व मुलांच्या उंचीवाढीचा दर वेगवेगळा असला तरी ठराविक वयात जर तुमच्या मुलाची उंची कमी असेल तर आईसाठी ही चिंतेची बाब असते, कारण आईच आपल्या मुलाच्या सवयी नीट समजून घेऊन त्याची देखभाल पूर्ण करू शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआपण आपल्या मुलांना घरगुती अन्न खाऊ घालणे आणि त्यांच्या आहारात पौष्टिक फळांचा समावेश करणे फायदेशीर ठरते . ते खाल्ल्याने मुलाची उंची झपाट्याने वाढू शकते.
पौष्टिक गुणधर्मांनी समृद्ध बदाम आणि दूध मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. यासाठी रात्री बदाम भिजवून ठेवावे, दुसऱ्या दिवशी मुलांना एक ग्लास बदाम घालून दूध पाजावे. बदामामध्ये असलेले अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशियम, मॅंगनीज, हेल्दी फॅट आणि फायबर लहान मुलांसाठी सर्व प्रकारे फायदेशीर असतात.
कॅल्शियमयुक्त ताजे दही मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप उपयुक्त आहे, त्यामुळे मुलांना दही खाण्याची सवय लावा. याशिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन डी आणि प्रोबायोटिक्स देखील मुलांची हाडे आतून मजबूत करून त्यांच्या विकासास मदत करतात.
मुलांना पालक-टोमॅटोसूप खायला दिल्यास मुलाची उंची वाढेल. हाडे मजबूत होण्यास मदत होते आणि हे सूप पिल्याने दृष्टीही उजळते.
सकाळी भिजवलेले हरभरा आणि गूळ मुलांना खायला दिल्यास त्यांची उंची झपाट्याने वाढू लागते, कारण हरभरा प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहेत. कार्बोहायड्रेटयुक्त गूळ देखील मुलांसाठी खूप फायदेशीर आहे.
मूल मांसाहारी असेल तर त्यांना अंडी आणि मासे खायला द्यावेत. प्रथिने, बायोटिन आणि लोह युक्त या गोष्टी मुलांची स्थिर उंची वाढवण्यास मदत करतात.
टीप : दररोज योगा केल्याने उंची वाढण्यास मदत होईल. तसेच उंचीसाठी पोहणे, सायकल चालवणे, धावणे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.