दररोज किती पाणी प्यावे? शरीर प्रकारानुसार मार्गदर्शन
दररोज ८ ग्लास पाणी पिणे हे सर्वांसाठी एकसारखं लागू होतं का? पाण्याची गरज शरीरप्रकार, वय, वजन, हवामान आणि जीवनशैलीवर अवलंबून असते.जाणून घ्या तुमच्या शरीरानुसार किती पाणी तुम्ही पिले पाहिजे.
Man Drinking water from a water bottle
1/11
पाणी हे शरीरासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. आपण जेवढं अन्न खातो त्याहूनही महत्त्वाचं पाणी आहे.
2/11
शरीरातील प्रत्येक क्रिया – पचन, शरीराचे तापमान नियंत्रण, टॉक्सिन्स बाहेर टाकणे – या सर्वांसाठी पाणी आवश्यक आहे.
3/11
पण "दररोज ८ ग्लास पाणी प्या" हे सर्वांसाठी एकसारखं लागू होतं का? याचं उत्तर – "नाही." कारण पाण्याची गरज शरीरप्रकार, वय, वजन, हवामान आणि जीवनशैली यावर अवलंबून असते.
4/11
शरीरप्रकारानुसार पाण्याचे प्रमाण ज्यामुळे शक्य तितके जास्त हायड्रेशन मिळते
5/11
१. बारीक किंवा सडपातळ शरीरप्रकार (Vata type):या प्रकारातील लोकांना शरीर थंड, कोरडं आणि थकवा जाणवणं सामान्य असतं.
6/11
वात प्रकृतीचे लोकांसाठी पाण्याचे प्रमाण: दिवसाला २.५ ते ३ लिटर गरम पाणी, हर्बल टी, सूप घेतल्यास जास्त फायदेशीर.
7/11
२. मध्यम प्रकृती / मजबूत शरीरप्रकार (Pitta type):शरीर गरम राहणं, त्वचा संवेदनशील असणं, भरपूर घाम येणं ही लक्षणं असतात.
8/11
पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी पाण्याचे प्रमाण: दिवसाला ३ ते ३.५ लिटर,थोडं थंडसर किंवा नारळपाणी उपयोगी ठरतं
9/11
३. जड किंवा स्थूल प्रकृती (Kapha type):शरीरात साठलेलं पाणी, सुस्ती, वजन वाढण्याची प्रवृत्ती
10/11
कफ प्रकृतीचे लोकांसाठी पाण्याचे प्रमाण: दिवसाला २ ते २.५ लिटर कोमट पाणी, लिंबूपाणी किंवा हळद टाकलेलं पाणी फायदेशीर इतर गोष्टी लक्षात घ्या:व्यायाम करत असल्यास: ०.५ ते १ लिटर अधिक
11/11
पण उन्हाळ्यात पाण्याची गरज जास्त वाढते थेट २-३ ग्लास पाणी एकदम पिण्यापेक्षा, दर १-२ तासांनी थोडं थोडं पिणं उत्तम
Published at : 02 Aug 2025 04:51 PM (IST)