फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती दिवस चालतं? जाणून घ्या!
फ्रिजमध्ये अन्न ठेवणं ही सध्या प्रत्येक घरातील सामान्य गोष्ट आहे, पण ते अन्न नेमकं किती दिवस सुरक्षित असतं हे अनेकांना माहिती नसतं.
फ्रिज
1/9
आपण रोज काही ना काही अन्न फ्रिजमध्ये ठेवतो – उरलेलं जेवण, भाजी, दही, इडली, चटणी, अगदी अंडी आणि मांससुद्धा!
2/9
पण हे अन्न किती दिवस सुरक्षित राहू शकतं, हे खरोखर माहिती आहे का?
3/9
चुकीच्या पद्धतीने साठवलेलं अन्न विषबाधा, अन्नाची चव खराब होणं आणि पचनासंबंधी त्रासास कारणीभूत ठरू शकतं.
4/9
म्हणूनच फ्रिजमध्ये काय ठेवायचं, किती दिवस ठेवायचं, आणि कुठल्या अन्नपदार्थांना लगेच संपवणं आवश्यक आहे – हे जाणून घेणं फार गरजेचं आहे!
5/9
उरलेलं शिजवलेलं जेवण २ ते ३ दिवस टिकतं, ते हवाबंद डब्यात ठेवून गरम करताना नीट उकळणं आवश्यक आहे.
6/9
कापलेली फळं आणि भाज्या १ ते २ दिवस फ्रिजमध्ये राहू शकतात, पण शक्य असल्यास त्या ताज्याच वापरणं चांगलं.
7/9
अंडी जरी २ ते ३ आठवडे टिकली, तरी उकडलेली अंडी एक आठवड्याच्या आत वापरणं सुरक्षित ठरतं.
8/9
मांस व मासे हे फ्रिजमध्ये १ ते २ दिवस आणि फ्रीझरमध्ये एअरटाइट पाउचमध्ये ठेवल्यास १ महिना टिकतात.
9/9
दूध ५ ते ७ दिवस चालू शकतं (जर त्याचं सील न उघडलेलं असेल), दही ३ ते ५ दिवस टिकतं, तर चटणी २ दिवसातच वापरलेली बरी!(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 23 Jul 2025 02:39 PM (IST)